Lucky Zodiac Signs : कामात यश मिळेल, भरभराटीचा दिवस! गुरुपौर्णिमेचा दिवस या ५ राशींसाठी लकी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कामात यश मिळेल, भरभराटीचा दिवस! गुरुपौर्णिमेचा दिवस या ५ राशींसाठी लकी

Lucky Zodiac Signs : कामात यश मिळेल, भरभराटीचा दिवस! गुरुपौर्णिमेचा दिवस या ५ राशींसाठी लकी

Published Jul 21, 2024 05:52 AM IST

Lucky Rashi Bhavishya 21 July 2024 : आज पौर्णिमा आहे आणि या तिथीला गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी समसप्तक योगासह सर्वार्थ सिद्धी योग, प्रीति योग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. आजचा रविवार या ५ राशींसाठी लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २१ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २१ जुलै २०२४

आज २१ जुलै २०२४ रोजी, चंद्र धनु राशीनंतर मकर राशीत जाणार असून, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये समसप्तक योग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे आणि या तिथीला गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी समसप्तक योगासह सर्वार्थ सिद्धी योग, प्रीति योग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींवर गुरु कृपा राहील आणि रविवार लकी ठरेल.

सिंहः 

आज नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधकावर मात करू शकाल. भरभराटीचा दिवस आहे. सहकार्य मिळेल. कामे पुर्णात्वास जातील. जुनी येणी वसूल होतील. कामकाजाचा विस्तार होईल.

कन्याः 

आज एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. दिवस फायदेशीर राहील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. व्यापार व्यवसायातील आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल.

वृश्चिकः 

आज दिवस मंगलमय आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान-सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. गृहसौख्यात भर पडेल. धंद्यात नवनवीन प्रयोग कराल. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

धनुः 

आज धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. आत्मविश्वासाने पावले पुढे टाकाल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम ग्रहमान आहे. अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी व प्रसन्न राहील. 

कुंभः 

आज आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता राहील. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिवस आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल.

Whats_app_banner