मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : बुधप्रदोष व्रताचा आजचा दिवस या ५ राशींसाठी भरभराटीचा, मिळेल उत्तम सहकार्य

Today lucky zodiac signs : बुधप्रदोष व्रताचा आजचा दिवस या ५ राशींसाठी भरभराटीचा, मिळेल उत्तम सहकार्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 21, 2024 12:04 PM IST

Lucky Rashi Today 21 february 2024: आज २१ फेब्रुवारी २०२४ बुधवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींना दिवस फायदेशीर जाईल.

lucky zodiac signs today 21 february 2024
lucky zodiac signs today 21 february 2024

आज बुधवार २१ फेब्रुवारी रोजी, मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत जाणार आहे. तसेच आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी आहे आणि ही तिथी बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाते. आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग बुध प्रदोष व्रताला होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध प्रदोष तिथीला शुभ योग तयार होत असल्याने या ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात जनमानसात प्रभाव पाडाल. कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. रोजगारात मनासारखी बढती व बदली होऊ शकते. सामाजिक कार्यातून मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल.

कर्क: 

आज स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाडूंना वेगवेगळ्या संधी मिळतील. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. प्रशंसा होईल. सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कष्टाने ध्येयपूर्ती होईल.

सिंहः 

आज खूप काम कराल आणि त्याचा लाभही तुम्हाला मिळेल. त्यामुळे आनंदी उत्साही राहाल. उत्तम सहकार्य मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. कामाचे कौतूक होऊन मान-सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल.

कन्या: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक सामंजस्य राहील. खूप दिवसांपासून अडलेली संधी हाती येईल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. घर व वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. 

तूळ: 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. स्वत:मध्ये असलेल्या कलेला न्याय द्याल. नवीन कल्पनांचा मागोवा घ्याल. कामानिमित्त परदेशगमनाच्या संधी मिळतील. महत्वाच्या कामात यश मिळेल. कुंटुबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून विशेष सहकार्य मिळेल. मोठ्यांची मर्जी व मान राखाल. कुटुंबातील सुखद वातावरण निर्माण होईल. व्यापारात आर्थिक योग उत्तम आहे. नोकरी व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून बढतीचे योग आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग