आज बुधवार २१ ऑगस्ट रोजी, चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जाणार असून, सिंह राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी असून या दिवशी त्रिग्रही योगासह सुकर्म योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज अनुकुल दिवस राहील. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वाहन खरेदीचा योग आहे. व्यवसायात अनुकूल अपेक्षित घटना घडतील. अचानक धनप्राप्तीची उत्तम संयोग निर्माण होतील. शास्त्रीय विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. संततीकडून समाधान लाभेल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. घरात शुभ समाचार अथवा मंगलकार्य असा संयोग आहे.
आज दिवस शुभ लाभदायी असणार आहे. महिलांना धार्मिक सत्संग उत्तम घडेल. व्यापारात नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक प्रश्न सुटतील. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. जोमाने चिकाटीने प्रयत्न करावे. अपेक्षित यश संपादन करता येईल. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेठी घडतील. व्यवसायात पैशाची आवक वाढल्याने आपण संतुष्ट असाल. खरेदी विक्रीतून फायदा होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस आनंददायी आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. शेअर्समध्ये अथवा कमी कालावधीची गुंतवणूक करताना ती विचार पूर्वक करणे गरजेचे राहील. व्यवसायातील नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. परदेश भ्रमणासाठी अनुकुल दिवस आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. उत्तम धनप्राप्तीचा योग आहे.
आज कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता आहे. आपल्या आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल. शुभवार्ता ऐकायला मिळेल.
आज आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. प्रवासाचे योग आहेत. आपल्या शांतप्रिय स्वभाव आणि गुणवैशिष्ट्यामुळे पुरेपूर फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील.