आज शुक्रवार २० सप्टेंबर रोजी, चंद्राचे मंगळच्या मेष राशीत भ्रमण होणार आहे आणि चंद्राच्या दुसऱ्या घरात गुरू असल्यामुळे सनफा योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी असून, या तिथीला तृतीया तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या तिसऱ्या दिवशी ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. या ५ राशींना शुभ योगाचा लाभ होणार आहे.
आज कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होईल. नातेवाईकांकडून तुम्हाला सहकार्य चांगले मिळणार आहे. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील.
आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. कार्यक्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटवाल. पैसा निश्चित मिळणार आहे. मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. घेतलेले निर्णय योग्य राहतील. आनंदी राहाल.
आज नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. नवीन योजना यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल.
आज प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे.
आज विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. मुलांकडून त्यांच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. खरेदी कराल. धंद्यात वाढ होईल. व्यवसायात वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल.