मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky zodiac signs today : ऋषीपंचमी आणि विष्कंभ योग करणार ‘या’ पाच राशींची भरभराट

Lucky zodiac signs today : ऋषीपंचमी आणि विष्कंभ योग करणार ‘या’ पाच राशींची भरभराट

HT Marathi Desk HT Marathi
Sep 20, 2023 09:24 AM IST

Lucky zodiac signs today 20 september 2023 : आज ॠषीपंचमी आणि विष्कंभ असा योग आहे. हा योग पाच राशींना लाभदायी ठरत आहे. कोणत्या आहेत या राशी?

Lcuky Zodiac signs today
Lcuky Zodiac signs today

सिंह : चंद्रबल अत्याधिक शुभ व लाभदायी आहे. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण उजळून निघतील. मानसन्मानाचा योग आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदारासाठी दिनमान प्रगतीकारक आहे. मनाजोगी कामे होतील आणि नव्या संधी प्राप्त होतील. सामाजिक कार्य करणाऱ्या जातकांची प्रतिष्ठा वाढेल. भावाची साथ लाभेल. मन प्रसन्न राहील. मुलांविषयीची चिंता मिटून जाईल. शुभ घटना घडतील. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. शुभ रंग: लाल. शुभ दिशा: पूर्व.

कुंभ : गुरूबल अनुकूल असल्यानं आनंदाचा दिवस आहे. आर्थिक आवक वाढीचा योग आहे. घरातील सदस्यांकडून उत्तम साथ लाभेल. नोकरीत समाधानकारक वातावरण राहील. वरिष्ठांची शाबासकीची थाप पाठीवर पडेल. नातलग, मित्रमंडळांचं सहकार्य आत्मविश्वास वाढवेल. आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊन मानसन्मान मिळेल. वाहन खरेदीचा योग आहे. जोडीदाराची साथ लाभेल. उद्योग-व्यवसायातील जातकांना आज केलेली गुंतवणूक इष्ट फळ देईल. नव्या प्रकल्पांचे प्रस्ताव येतील. वाटचाल सकारात्मक होईल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य ठणठणीत राहील. शुभ रंग: जांभळा. शुभ दिशा: नैऋत्य.

धनु : आजच्या दिवसात अत्यंत शुभ घटना घडणार आहेत. अध्यात्माची ओढ लागेल. संतसहवासाचा लाभ होईल. संतसेवेच्या माध्यमातून धनप्राप्तीचा योग आहे. सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हाल. पत्नीकडून आणि मुलांकडून सुख मिळेल. लेखन व प्रकाशन क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. जवळच्या नातेवाईकांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. घरात धार्मिक कार्याचा योग आहे. मैत्रीचा फायदा होईल. प्रवासातून आर्थिक लाभाचा योग संभवतो. विद्यार्थ्यांना यशप्राप्ती होईल. विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत अपेक्षित ठिकाणी बदलीचे योग आहेत. शुभ रंग: पिवळसर. शुभ दिशा: ईशान्य.

वृश्चिक: हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यापार, व्यवसाय व रोजगारात आर्थिक योग उत्तम आहेत. व्यवसायात तेजी राहील. वरिष्ठांच्या अनुकूल मतामुळे नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील ज्येष्ठांचं प्रेम मिळेल. सार्वजनिक जीवनातील पत वाढेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात गती लाभेल. कार्यपद्धतीत सुधारणा होईल. आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाहीत. शुभ रंग: तांबूस शुभ दिशा: दक्षिण.

मकरः अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. मनोधैर्य व आत्मविश्वास वाढलेला असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रतिष्ठा, मानसन्मान लाभेल. नियोजित कामं वेळेवर कराल. नव्या कल्पनांवर काम सुरू कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल. केलेल्या कष्टातून उत्तम धनप्राप्ती होईल. खरेदीसाठी आज दिनमान शुभ आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. पत वाढेल. लांबचा प्रवास हितकारक ठरेल. शुभ रंग: निळा शुभ दिशा: पश्चिम.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. अनुकरण करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.)

WhatsApp channel