आज रविवार २० ऑक्टोबर रोजी, चंद्र त्याच्या उच्च वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे बृहस्पति आधीच उपस्थित आहे, गजकेसरी योग तयार करेल. तसेच आज आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून,संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी गजकेसरी योगासह व्यतिपात योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या ५ राशींना आजचा सुट्टीचा दिवस आर्थिक लाभाचा आहे.
आज प्रवासाचे योग आहेत. फायदा होईल. महिला वर्गासाठी अतिशय अनुकूल दिनमान आहे. आपली मानसिक स्थिती प्रसन्न राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. आर्थिक उत्पन्न मनासारखे होईल. स्पर्धापरिक्षेत यशदेणारा दिवस आहे. आत्मविश्वास द्विगुणित होईल. कौटुंबिक जीवनात आनंद घ्याल. संततीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रसन्न राहील. प्रगतीकारक दिवस आहे.
आज अचानक धनलाभाची संधी मिळेल. आर्थिक गुंतवणूक कराल. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. धंद्यात नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. घरात नोकरवर्गाचे सहकार्य न मिळाल्यामुळे नेहमीच्या दिनचर्येत अडचणी येतील. सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. वैवाहीक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. आपले मनोबल आत्मविश्वास उंचावलेला असेल. गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
आज अडलेली कामे मार्गी लागतील. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. नविन संधी प्रस्ताव येतील. आपला आत्मविश्वास द्विगुणित राहणार आहे. मनात प्रसन्नता असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. अनुकुल घटना घडतील.
आज शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामातुन लाभ होईल. जोडीदाराकडून गृहसौख्य उत्तम मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत अनुकुलता असणार आहे. उत्साही वातावरण राहील. परदेशगमनाच्या संधी येतील. आवडीनिवडी पूर्ण करू शकाल. मनोरंजनाकडे कल राहील. कुंटुंबात एखादी शुभ घटना घडेल. योग्य नियोजन आचुक निर्णय यामुळे यश लाभेल. व्यापारात उत्तम धनलाभ होईल. कुटुंबात देखील उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. तिर्थक्षेत्री यात्रा घडतील. आज भाग्याची साथ लाभेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात उत्तम धनप्राप्तीचा योग आहे. व्यापार व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. नवीन वाहन अथवा चैनीच्या वस्तू खरेदीचे योग आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होतील. परदेश भ्रमणासाठी अनुकुल काळ आहे.
संबंधित बातम्या