आज सोमवार २० मे २०२४ रोजी, कन्या राशीनंतर चंद्र तूळ राशीत जाणार आहे. तसेच, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे आणि या तिथीला वर्षातील पहिले सोम प्रदोष व्रत पाळले जाईल. सोम प्रदोष तिथीच्या दिवशी सिद्धी योग, षष्ठ योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोगही होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सोमप्रदोषचा दिवस या ५ राशीच्या व्यक्तिंसाठी लकी ठरणार आहे.
आज आर्थिक स्थिती उत्तम राहील. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आत्मविश्वास वाढेल.
आज कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल.
आज स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल.
आज समाजात मान मिळेल. नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल.
आज उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.