आज बुधवार २० मार्च रोजी, चंद्र स्वतःच्या राशीत कर्क राशीत आहे आणि बृहस्पती सोबत चतुर्थ दशम योग बनवत आहे, ज्याला केंद्र योग देखील म्हणतात. त्यामुळे आज आमलकी एकादशीच्या दिवशी गजकेसरी नावाचा शुभ योग तयार होत आहे. आमलकी एकादशीच्या दिवशी गजकेसरी योगासह रवि योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत आजचा दिवस २० मार्च हा ५ राशींसाठी खूप भाग्यवान असेल.
आज कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. नवीन कल्पनांच्या जोरावर बरेच काही साधून जाल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.
आज धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. परिवारातून शुभ संदेश मिळतील. कुटुंबासोबत दुरवरच्या प्रवासाचं नियोजन कराल.
आज नोकरीत कौतुकास पात्र ठराल. संधी मिळेल. उत्तम कलाकृतीसाठी कौतुकास पात्र ठराल. फायदा तोटा बाजूला ठेवला तरी धंद्यामध्ये तुमच्या बुद्धीची झलक आणि योग्य समयसूचकता दिसून येईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल.
आज खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. नोकरी बदलाचे योग आहेत. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी ठिकाणी वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. त्यामुळे कामाला आपोआपच गती येईल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. दुरवरचे प्रवास लाभदायक भौतिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.
आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. व्यापाराचा विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
संबंधित बातम्या