आज गुरुवार २० जून २०२४ रोजी, चंद्राचे मंगळ, वृश्चिक राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी शुभ योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना फायदा होणार आहे. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.
आज ग्रह नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. पराक्रमाची शर्थ कराल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नावलौकिक वाढेल. अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे.
आज ग्रह नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापार उद्योगात वृद्धी होईल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल.
आज ग्रह नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात लाभदायक आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. लाभदायक दिवस आहे. उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. गुंतवणूक लाभ देणार आहे.
आज आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल.
आज तब्येत खूष राहील. परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. पदप्राप्तीचे योग आहेत.
संबंधित बातम्या