Lucky Zodiac Signs : रेंगाळलेली कामे गती होतील, आर्थिक फायद्याचा शनिवार! या ५ राशींसाठी लकी दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : रेंगाळलेली कामे गती होतील, आर्थिक फायद्याचा शनिवार! या ५ राशींसाठी लकी दिवस

Lucky Zodiac Signs : रेंगाळलेली कामे गती होतील, आर्थिक फायद्याचा शनिवार! या ५ राशींसाठी लकी दिवस

Jul 20, 2024 11:08 AM IST

Lucky Rashi Bhavishya 20 July 2024 : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी द्विग्रह योगासह रवियोग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आजचा शनिवारचा दिवस या ५ राशींसाठी लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २० जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २० जुलै २०२४

आज २० जुलै २०२४ रोजी, चंद्राचे गुरूच्या धनु राशीत भ्रमण झाले असून कर्क राशीत सूर्य आणि शुक्र सोबत द्विग्रह योग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी द्विग्रह योगासह रवियोग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ होईल. वाचा कोणत्या आहेत या लकी राशी.

मेषः 

आज मन प्रसन्न असेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. व्यापारी वर्गाला आर्थिक फायदयाचा दिवस आहे. कार्य क्षेत्रात वृद्धी होईल. आयुष्यातील जोडीदाराकडून आपणास अनुकूल असे सहकार्य लाभणार आहे. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला फलदायी दिवस आहे. मान-सन्मान प्रतिष्ठा प्राप्त वाढेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आज आनंदी व ऊत्साही दिवस राहील. 

वृषभः 

आज मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल.  तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करणार आहात. कुटुंबातून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्याची विद्याभासात प्रगती होईल. लाभदायक घटना घडतील. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. 

कन्याः 

आजचं यश निश्चित लाभणार असून, नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. 

तूळ: 

आज आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. रचनात्मक कामाकडे ओढ राहील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. प्रतिष्ठा वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार तेजी राहील. अधिक प्रयत्न केल्यास जास्तीचे यश मिळू शकेल. भाऊबहिणीसी सलोख्याचे संबंध राहतील. कुंटुबातील आनंददायी आणि सहकार्याचे वातावरण राहील. 

मकरः 

आज लाभदायक दिवस आहे. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत पार पाडाल. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पदप्राप्ती होईल. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. गृहस्थी जीवन जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. 

Whats_app_banner