मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Lucky Zodiac Signs : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस मनावरचा ताण हलका करणारा

Today Lucky Zodiac Signs : 'या' चार राशींसाठी आजचा दिवस मनावरचा ताण हलका करणारा

HT Marathi Desk HT Marathi
Jan 20, 2024 12:50 PM IST

Lucky Rashi today 20 January 2024 : मेष, कर्क, कन्या व धनु राशीसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. जाणून घेऊया सविस्तर राशीभविष्य…

Today Lucky Zodiac Signs
Today Lucky Zodiac Signs

 

मेष (Aries Zodiac)

मेष राशीच्या जातकांसाठी आजचा अमृत योग अमृताहुनी गोड आहे. आज ग्रहमान अनुकूल राहील. आर्थिक स्थिती भक्कम राहील, त्यामुळं चिंता नसेल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कामाची योग्य आखणी व तंत्रज्ञानाच्या वापरामुळं व्यवसायाची गती वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रगतीकारक दिवस आहे. वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना बहर येईल. तरुणांसाठी अनुकूल काळ आहे. नव्या संधी खुणावतील. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल. स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळेल, मात्र त्यासाठी अधिकचे कष्ट घ्यावे लागतील. वेळेच योग्य नियोजन केल्यास फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना कागदोपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करा. मुलांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. शुभ रंग: भगवा शुभ दिशा: दक्षिण. शुभ अंकः ०४, ०८.

कर्क (Cancer Zodiac)

चंद्र आज मंगळाच्या राशी नक्षत्रातून भ्रमण करत आहे. कर्जाचं ओझं कमी करण्यासाठी उत्तम दिवस आहे.  व्यावसायिकांसाठी अनुकूल काळ आहे. कौटुंबिक पातळीवरही सौख्य राहील. जोडीदारामुळं तुम्हाला आर्थिक लाभ होईल. घरामध्ये पाहुणे येतील. त्यामुळं वातावरण खेळीमेळीचं राहील. नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षानं दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. मनाजोग्या घटना घडतील. ध्येयप्राप्तीसाठी निश्चयानं वाटचाल करा. सरकारी नोकरीतील लोकांना बढती मिळण्याचे योग आहेत. आर्थिक आवक उत्तम राहील. त्यामुळं मन समाधानी राहील. कुटुंबातील वातावरण समाधानी राहील. कलाकारांना विशेषत: गायकांना प्रसिद्धी मिळेल. मानसिक शांतता लाभेल. त्यामुळं आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग: गुलाबी शुभ दिशा: पश्चिम. शुभ अंकः ०६, ०९.

कन्या (Virgo Zodiac)

शुभ स्थानातील चंद्रभ्रमण आज विशेष लाभदायी ठरेल. नोकरीधंद्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सहकार्य लाभेल. चांगली कामं मिळतील. परखड मतप्रदर्शनामुळं तुमचं कौतुक होईल. घरात नवीन खरेदी होईल. त्यामुळं वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या यशस्वीपणे पार पाडाल. व्यवसायात आर्थिक तेजी राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. तुमच्या मृदू स्वभावामुळं व उत्तम आचरणामुळं नावलौकिक वाढेल. वारसाहकानं धन व संपत्तीचा लाभ होईल. नव्या कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग आहे. जमीन खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक लाभ होईल. धार्मिक कार्याची ओढ लागेल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०६.

धनु (Sagittarius zodiac)

धनु राशीचा स्वामी गुरूचं पाठबळ आज मिळेल. चंद्रभ्रमण शुभ स्थानातून होत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करियरसाठी आर्थिक तरतूद करण्याचा विचार कराल. तुमच्या नवीन कल्पनांचे कुटुंबात स्वागत होईल. इतरांना आर्थिक मदत करताना सावध राहा. नात्यात, मैत्रीत गोडवा राहील. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. मनातील योजना तडीस जातील. नवा मित्रपरिवार जोडला जाईल. शुभ रंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य. शुभ अंकः ०३, ०५.

WhatsApp channel
विभाग