मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : जया एकादशीला या ५ राशींचे पालटणार नशीब; कौटुंबिक सौख्यासह धनलाभाचे खास योग

Today lucky zodiac signs : जया एकादशीला या ५ राशींचे पालटणार नशीब; कौटुंबिक सौख्यासह धनलाभाचे खास योग

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 20, 2024 11:32 AM IST

Lucky Rashi Today 20 february 2024 : आज २० फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी, ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात या ५ राशींचे भाग्य उजळेल. पाहा तुमची राशी आहे का.

lucky zodiac signs today 20 february 2024
lucky zodiac signs today 20 february 2024

आज मंगळवार २० फेब्रुवारी रोजी मिथुन राशीत चंद्राचे भ्रमण होत आहे. तसेच आज माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून ही तिथी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. जया एकादशीला प्रीति योग, आयुष्मान योग, रवि योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जया एकादशीला या ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल.

मेष: 

आज नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्यही मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. वाहन व घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. प्रेमी जनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंद होईल.

वृषभ: 

आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. 

सिंहः 

आज फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक आघाडीवर प्रगती होईल. आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. 

कन्या: 

आज आनंददायी वातावरण राहील. फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. खेळाडूंना योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. व्यवसायानिमित्त प्रवास होईल. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल.

वृश्चिक: 

आज भाग्याची साथ चांगली मिळेल. व्यवसायात साम-दाम, दंड-भेद या नीतीने वागून तुम्ही ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. उत्साहाचे वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील, त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)