आज मंगळवार २० ऑगस्ट रोजी, चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी त्रिपुष्कर योग, त्रिग्रही योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात आर्थिक लाभ घडतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. कामाचा दर्जा सुधारेल. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल.
आज समाधानकारक दिनमान असेल. धाडसी निर्णय घ्याल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले मतभेद दूर होतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. मित्र आणि भागीदाराकडून सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. व्यापारीवर्गाला आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आज आनंदी व ऊत्साही राहाल. संततीकडून शुभ संदेश मिळतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. अनुकूल दिवस आहे. तुम्हाला सहकार्यही मिळेल. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील.
आज अनुकुल स्थिती राहणार आहे. कलाकारांना चांगला वाव मिळेल. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. मुलांकडुन समाधान मिळेल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर सिद्ध होईल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
आज मन प्रसन्न राहील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रसिद्धीचे योग येतील. आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. परमेश्वरावर विशेष आस्था निर्माण होईल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान मिळेल. लेखन प्रकाशित होईल. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल.