आज सोमवार २ सप्टेंबर रोजी, चंद्र सूर्याच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, ही तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. तसेच आज शेवटचा श्रावण सोमवार आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवयोग, सिद्ध योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ राशींना लकी दिवस जाईल. आज शुभ योगाचा खास लाभ मिळणार आहे.
आज शुभ शिव योगात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. अनुकूल वातावरण निर्माण होईल. यशस्वी दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. कुटुंबात सुख समाधानाचे वातावरण राहील.
आज शिव योगात तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. आरोग्य उत्तम राहील. दुरवरचे प्रवास घडतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल.
आज नशीबाची साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
आज व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. फायदा होणार आहे. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल.
मकर:
आज नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. कलाकारांची कला बहरेल. संधी मिळतील. उत्साहदायी दिवस ठरेल. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. घरातील काही प्रश्नांसाठी एकत्र तोडगे काढावे लागतील.