Lucky Zodiac Signs : कौटुंबिक सौख्य लाभेल! या ५ लकी राशीच्या लोकांची पैशाची कामे होतील-lucky zodiac signs today 2 october 2024 astrology predictions for mesh vrishabh tula vrishchik makar rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : कौटुंबिक सौख्य लाभेल! या ५ लकी राशीच्या लोकांची पैशाची कामे होतील

Lucky Zodiac Signs : कौटुंबिक सौख्य लाभेल! या ५ लकी राशीच्या लोकांची पैशाची कामे होतील

Oct 02, 2024 08:46 AM IST

Lucky Rashi Bhavishya 2 October 2024 : आज भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, या दिवशी ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, ऐंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२४

आज बुधवार २ ऑक्टोबर रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, ही तिथी सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि या दिवशी श्राद्ध विधी व तर्पण करून पितरांना निरोप दिला जातो. 

सर्वपित्री अमावस्या श्राद्धाच्या दिवशी ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, ऐंद्र योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अशात ५ लकी राशींना लाभ होईल.

मेष: 

आज उत्तम दिवस आहे. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. मनोबल उंचावलेले असेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. अधिक लाभ होतील.

वृषभः 

आज कामाचा दर्जा वाढेल. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आपले प्रयत्न यशस्वी होतील.

तूळ: 

आज तरुणांना प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. आर्थिक लाभ चांगला होईल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

वृश्चिकः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. अनेक मार्गांनी संधी येतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. 

मकरः 

आज पैशाची कामे होतील. यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच समस्या सुटतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. 

Whats_app_banner