मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : एकादशीचा दिवस ठरेल उत्तम यशाचा! 'या' ५ राशींच्या लोकांना सुखद संधी लाभेल

Lucky Zodiac Signs : एकादशीचा दिवस ठरेल उत्तम यशाचा! 'या' ५ राशींच्या लोकांना सुखद संधी लाभेल

Jul 02, 2024 06:37 AM IST

Lucky Rashi Bhavishya 2 July 2024 : आज एकादशी तिथी असून, या तिथीला योगिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशीचे लोकं ठरतील लकी.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य २ जुलै २०२४

आज २ जुलै २०२४ मंगळवार रोजी, चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला योगिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. योगिनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, त्रिपुष्कर योग आणि कृतिका नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार योगिनी एकादशी व्रताच्या दिवशी ५ राशींना शुभ योग तयार होण्याचा लाभ मिळेल.

मेषः 

आज मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण कराल. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे.

कर्क: 

आजचा दिवस उत्तम आहे. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कष्टाचे चीज होईल. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. गोड बोलून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. 

सिंहः 

आज आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. नवीन संधी लाभेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवून कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.

कन्याः 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य मिळेल. मोठ्या भावंडांची मदत मिळेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. आनंदाची बातमी कळेल. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल.

वृश्चिकः 

आज व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. प्रेरणा मिळेल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. आपल्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. 

WhatsApp channel