मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: सौभाग्य योग या ५ राशींना देईल उत्तम फळ, बढतीचे योग व मान-सन्मान मिळेल

Today lucky zodiac signs: सौभाग्य योग या ५ राशींना देईल उत्तम फळ, बढतीचे योग व मान-सन्मान मिळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 02, 2024 10:17 AM IST

Lucky Rashi Today 2 january 2024: आज नववर्षाचा पहिला मंगळवार या ५ राशींसाठी भाग्याची साथ देणारा ठरेल. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 2 january 2024
lucky zodiac signs today 2 january 2024

आज २ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी,सिंह राशीनंतर चंद्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी सौभाग्य योग, शोभन योग, त्रिपुष्कर योग, रवियोग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगाचा ५ राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

मेष: 

आज ग्रह-नक्षत्राचा योग तुमच्यासाठी उत्तम स्थितीत आहे. अपेक्षीत व्यवहार योग्यरित्या पार पाडाल. व्यापारी वर्गास खरेदी पासून व्यवसायात अचानक फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील. नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. झेपणारे काम स्वीकाराल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. सामाजिक उत्सवातील सहभाग समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी देईल. आपल्या शब्दांचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. कुटुंबामधून आपणास सुखद बातमी मिळेल.

मिथुनः 

आज आवश्यक त्या सुविधा वरिष्ठ देऊ करतील. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. व्यापारीवर्गाकरिता आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. विरोधकावर मात कराल. संतती कडून चांगली बातमी मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल.

मकर: 

आज ग्रह-नक्षत्राचा योग आपणास आर्थिक लाभ देईल. मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. धन संचय करा. कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. थोराचे निर्णय लाभदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. मान प्रतिष्ठा वाढविणारा दिवस आहे. मानी आणि अहंकारी वृत्तीचा मात्र त्याग करा. ध्येय निश्चित करा. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. आज यश निश्चित लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे.प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील.पोलिस सैन्यातील व्यक्तीकरीता कर्मस्थ मंगळामुळे पदप्राप्ती मानसन्मान वाढीस लागेल. गृहस्थी सौख्य लाभेल.

कुंभ: 

आज चंद्रबल उत्तम असल्याने अंत्यत शुभ दिवस आहे. व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मेहनत आणि कुठल्या ही कार्याच्या प्रति तुमचा कल पाहून आपल्या उत्तम कार्यासाठी कार्यक्षेत्रात ओळखतील मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे.

मीन: 

आज रवि-चंद्र योगात आपणास दिनमान उत्तम राहील. पित्यापासून अथवा वडिलधाऱ्या व्यक्ती पासून आर्थिक लाभ होतील. नोकरीत असाल तर बढतीचे योग आहेत. लोकांना पटेल रुचेल असेच वक्तव्य करा. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आपला आत्म विशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईका कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहिल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहिल.स्वभावातील गुणदोषं मात्र टाळावेत. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. एकंदरीत आजचं दिनमान उत्तम आहे. आकस्मिक धनलाभ होईल.