आज गुरुवार १९ सप्टेंबर रोजी, चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी असून, या तिथीला द्वितीया तिथीचे श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षाच्या दुसऱ्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षाच्या द्वितीया तिथीला ५ राशींना शुभ योगाचा लाभ होणार आहे.
आज नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडेल. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहील. धनवृद्धी होईल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात तुमची स्थिती उत्तम होईल. कमाईमध्ये वाढ होण्याचे योग आहेत. प्रयत्न करून आणि आपल्या धैर्याच्या प्रति सजग राहण्याची आवश्यकता आहे. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. दिवस उत्तम राहील.
आज अंत्यत शुभ दिवस आहे. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. राजकीय सामाजिक कला क्षेत्रातील व्यक्तींना शुभ दिनमान आहे. सरकारी योजना आमलांत आणल्या जातील. कलाकाराचा मान सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी लाभेल. आकस्मिक लाभ होतील.
आज दिवस उत्तम राहील. आर्थिक लाभ होतील. नोकरीसंबंधी बढतीचे योग आहेत. विलासी वस्तूंची खरेदी कराल. आत्मविशास वाढीस लागेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लाभे. मित्रमैत्रिणी नातेवाईकां कडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. सहकार्य लाभेल. शासकिय योजनेतून लाभ होईल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील.
आज आपल्याला अपेक्षीत व्यवहार योग्य रित्या पार पाडणारे ग्रहमान आहे. आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल. प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. आपल्या वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरावर पडेल. कुटुंबामधून सुवार्ता मिळणार आहे. सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. भाग्यकारक घटना घडतील.