मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  lucky zodiac signs today : रोजगार, व्यापार आणि विद्याभ्यासात यशसिद्धीचा दिवस, या राशी ठरतील भाग्यवान

lucky zodiac signs today : रोजगार, व्यापार आणि विद्याभ्यासात यशसिद्धीचा दिवस, या राशी ठरतील भाग्यवान

HT Marathi Desk HT Marathi
Sep 19, 2023 10:51 AM IST

Lucky zodiac signs today 2023 : गणेश चतुर्थीचा आजचा दिवस शुक्र-चंद्र राजयोगाचा आहे. बहुतेक राशींसाठी आजचा दिवस फलदायी आहे.

Lucky zodiac signs today
Lucky zodiac signs today

सिंह : गणेश चतुर्थीचा आजचा दिवस आनंद आणि यश घेऊन आला आहे. सिंह राशीसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. वातावरण प्रसन्न असेल. कुटुंबातील सदस्याचं तुमच्या विषयी चांगलं मत बनेल. प्रयत्नाच्या तुलनेत अधिक यश मिळेल, पण प्रयत्न एकाग्रतेनं करणं आवश्यक आहे. वेळेचं अचूक नियोजन होऊन कामं कराल. कामाच्या ठिकाणी पाठीवर शाबासकीची थाप पडेल. शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल दिवस आहे. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी होऊन व्यवसायाचा विस्तार होईल. सामाजिक कार्यात सक्रिय व्हाल. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. शुभ रंगः लाल शुभ दिशाः पूर्व.

मिथुन : आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे. मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनुकूल दिवस आहे. आनंदवार्ता कानी पडेल. नव्या योजना यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. नवे आर्थिक स्त्रोत निर्माण होतील. उद्योग-व्यापारात आर्थिक लाभ निश्चित आहे. मनोइच्छित फलप्राप्ती होईल. कुटुंबात सुखासमाधानचं वातावरण राहील. तुमच्या कामाचं घरच्यांकडून कौतुक होईल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर.

कर्क : कर्क राशीच्या जातकांची मनोवस्था आजि आनंदाचा दिनु अशीच असेल. वाहन व्यवसायातील लोकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस आहे. साहित्याच्या व संपादनाच्या क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल. रखडलेली जुनी थकबाकी वसूल होईल. कर्जाचे अर्ज मंजूर होतील. सुखद प्रवासाचा योग आहे. गुंतवणूक लाभदायी ठरेल. आवक वाढेल. प्रशासकीय सहकार्य मिळेल. राजकीय व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान मिळेल. शुभ रंगः सफेद. शुभ दिशाः वायव्य.

मकर : रोजगारात प्रगतीचा दिवस आहे. कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवाल. व्यापार-व्यवसायात विस्ताराचा योग आहे. प्रयत्नांच्या तुलनेत अधिक लाभ संभवतो. नोकरीत प्रमोशनचा योग आहे. कलेच्य व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी ग्रहमान अनुकूल आहे. विद्यार्थांच्या गळ्यात यशाची माळ पडेल. कलाक्षेत्रातील महिला प्रगतीची नवी उंची गाठतील. भागीदारात व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे. शॉर्ट टर्म गुंतवणूक फायद्याची ठरेल. शुभ रंगः निळा. शुभ दिशाः नैऋत्य.

कन्या : कुटुंबात वातावरण सुखासमाधानाचे राहील. आरोग्य ठणठणीत राहील. विद्यार्थ्यांसाठीही अनुकूल दिवस आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. शुभकार्याची आखणी कराल. राजकीय क्षेत्रात यशाचा योग आहे. अधिक फायद्यासाठी केलेले प्रयत्न फलद्रूप होतील. मित्रमंडळींची भक्कम साथ मिळेल. प्रवासातून लाभ होईल. परदेश प्रवासाचा योग आहे. शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रातील माहितीवर आधारीत आहे. ती पूर्णपणे सत्य आणि योग्य आहे असा आमचा दावा नाही. त्यामुळं त्यानुसार अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel