Lucky Zodiac Signs : नशीबाचे पाठबळ लाभणार! या ५ लकी राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : नशीबाचे पाठबळ लाभणार! या ५ लकी राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार

Lucky Zodiac Signs : नशीबाचे पाठबळ लाभणार! या ५ लकी राशींना भरपूर आर्थिक लाभ होणार

Oct 19, 2024 09:43 AM IST

Lucky Rashi Bhavishya 19 October 2024 : आज आश्विन मासातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी असून, या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, अशात या ५ राशीच्या लोकांना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशीभविष्य
लकी राशीभविष्य, नशीबवान राशीभविष्य

आज शनिवार १९ ऑक्टोबर रोजी, चंद्र मेष राशीनंतर वृषभ राशीत जाणार आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेष: 

आज नोकरीत मनाजोगे घडेल. आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नवीन प्रयोग यशस्वी होईल. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. प्रेमप्रकरणात यश येईल. कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. आर्थिक बाबतीत वाढ होईल. परदेशगमनाचे योग आहेत.

कन्या: 

आज नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. कुंटुंबात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. कार्यक्षेत्रात सबुरीने वाटचाल करा. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहील. मान सन्मानात वाढ होईल. 

तूळ: 

आज काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वादही मिटतील. नवीन कार किंवा घर खरेदी करण्याची परिस्थिती होईल. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. कर्मावर विश्वास ठेवा. कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. भांवडाकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. मानसन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील. 

वृश्चिक: 

आज भरपूर आर्थिक लाभ होईल. घरामध्ये चांगले वातावरण असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात आकस्मिक लाभाचा योग आहे. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. 

मीन: 

आज राहिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नोकरीत प्रगतीकारक दिवस असुन नवीन चांगली संधी अथवा पदोन्नती होईल. रोजगारात कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. स्वास्थ उत्तम राहील. ज्येष्ठ व्यक्तिंच्या सहवास लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. गृहसौख्य उत्तम आहे.

Whats_app_banner