आज रविवार १९ मे २०२४ रोजी, बुध ग्रहाच्या कन्या राशीत चंद्र भ्रमण करत आहे, तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला मोहिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या तिथीला भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता. मोहिनी एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मोहिनी एकादशीचा दिवस या ५ राशीच्या व्यक्तिंसाठी लकी ठरणार आहे.
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज रविवारी मोहिनी एकादशीचा शुभ योग आहे. या योगात समाजात तुम्हाला चांगली प्रतिष्ठा प्राप्त होईल. घरामध्ये नवनवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या मोठ्या मानाने पार पाडाल. सर्व भार एकट्यावर आल्याने मनावर थोडासा दबावही येईल. यशाचे नवे दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील. अचानक दूरचा प्रवास करण्याचा योग येईल. आनंददायक घटना घडतील. व्यवसायिकांना इतरांवर अवलंबून राहणे नुकसानदायक ठरणार आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्यांना लोकांची दाद तर मिळेलच शिवाय सन्मानही मिळेल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.
आज सुट्टीचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आहे. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांसाठी चांगला दिवस आहे. क्रीडा क्षेत्रातील लोकांना भविष्याच्या दृष्टिकोनातून शुभ वार्ता कानावर पडतील. मन स्थिर असल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. धनलाभ होऊन आर्थिक स्थैर्य लाभेल. अनेक दिवसांपासून अडकून असलेली कामे पूर्णत्वास जातील. मनातील शंका लांब करून प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासानेतोंड द्या. तुम्हाला यश निश्चित लाभेल. व्यापार उद्योगात चांगली वृद्धी होईल. मनासारख्या गोष्टी घडल्याने मन आनंदी आणि शांत राहील. मात्र मनात असलेल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी रुची वाढवून काम करावे लागेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात आर्थिक फायदा होऊ शकतो. मनःशांती साठी धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टी करण्यावर भर द्याल. आणि त्यातून धैर्यसुद्धा लाभेल.
आज मोहिनी एकादशी आणि अमृत सिद्धी योगाचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. कलाकारांना आपली कला दाखवण्याची योग्य संधी मिळेल. घरामध्ये एखादा मनोरंजक कार्यक्रम करण्याची योजना आखाल. उद्योग-व्यवसायात असणाऱ्यांना आजचा दिवस लाभकारक आहे. तुमच्या दमदार व्यक्तीमत्वाचा प्रभाव लोकांवर पडणार आहे. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत रेंगाळलेली कामे पूर्णत्वास जातील. वैवाहिक आयुष्यात पतीपत्नीमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आजच्या दिवशी मानसिक धैर्य वाढेल. मिळकतीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पैसा हातात आल्याने आयुष्यात आर्थिक स्थिरता येईल. व्यापाऱ्यांना आज मोठा ग्राहक मिळू शकतो. त्यामुळे आर्थिक फायदा होणार आहे. लव लाईफ आणखीन चांगली होण्यासाठी जोडीदाराला एखादे सरप्राईज देणे सोयीचे ठरेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. व्यापाऱ्यांचा व्यवसायात पाया आणखी मजबूत होईल. सामाजिक कार्यांमध्ये विशेष लक्ष देऊन जनहिताचे कार्य कराल. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. महत्वाच्या कामात जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश येईल. कोणत्याही विषयात निष्काळजीपणा न करता स्वतःच्या मनाने विचार करुन निर्णय घ्या. लेखन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना आज चांगला फायदा होईल. ऑफिसमध्ये मात्र लक्षपूर्वक काम हाताळावे लागेल. तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. अथवा जुनी दुखणी पुन्हा नव्याने डोकी वर काढू शकतात. ताणतणावात्मक परिस्थितीपासून दूर राहा, नाहीतर मानसिक स्थिती बिघडू शकते.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. ग्रहांच्या शुभ प्रभावात आज कोणत्याही कामात तुम्हाला कष्टापेक्षा अधिक लाभ मिळेल. नोकरीत पदोन्नती होऊन वेतनवाढ होण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठाकडून योग्य मदत मिळेल. व्यापारात भागीदारासोबत नव्या कामाला सुरुवात करण्यास दिवस अत्यंत शुभ आहे. मित्रांकडून आर्थिक गुंतवणुकीचे प्रस्ताव येतील. घरामध्ये शुभ कार्य घडून येतील. महत्वाच्या कामात पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. भोजनाच्या सवयींवर नियंत्रण ठेवा.अथवा आरोग्यविषयक समस्या जाणवू शकतात. नातेवाइकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामानिमित्त परदेशी जाण्याचा योग येईल.
संबंधित बातम्या