मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : या ५ राशी ठरतील भाग्यवान; कौटुंबिक सौख्य मिळेल, आर्थिल लाभ होईल

Today lucky zodiac signs : या ५ राशी ठरतील भाग्यवान; कौटुंबिक सौख्य मिळेल, आर्थिल लाभ होईल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 19, 2024 01:42 PM IST

Lucky Rashi Today 19 march 2024 : आज १९ मार्च २०२४ मंगळवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना आर्थिक फायदा होईल. वाचा या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

नशीबवान राशी १९ मार्च २०२४
नशीबवान राशी १९ मार्च २०२४

आज मंगळवार १९ मार्च रोजी मिथुन राशीनंतर चंद्र कर्क राशीत जाणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची दहावी तिथी असून या दिवशी शोभन योग, रवियोग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होणार असल्याने आजचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

वृषभः 

आज नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी व्हाल. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. आपला नावलौकिक वाढेल. 

मिथुन: 

आज शुभ फलदायी घटना घडणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍यांना विशेष संधी मिळतील. कामाची गती वाढेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. उत्तम धनप्राप्ती होईल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.

कन्याः 

आज फायदा होईल. आर्थिक आघाडी वर प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे नोकरी व्यापारात कामाचा विस्तार होईल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. 

तूळ: 

आज कामाच्या पद्धतीत बदल कराल. गोड बोलण्यावर भर ठेवाल. फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. उच्च शिक्षणाच्या अभ्यासात जास्त लक्ष घालाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. 

धनु: 

आज भाग्याची साथ चांगली मिळेल. उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. 

WhatsApp channel