मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : सिद्ध योगात योग्य संधी चालून येईल! 'या' ५ राशींना प्रदोष व्रताचा आजचा दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : सिद्ध योगात योग्य संधी चालून येईल! 'या' ५ राशींना प्रदोष व्रताचा आजचा दिवस ठरेल लकी

Jun 19, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 19 June 2024 : ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलाने आज बुद्ध प्रदोष व्रताच्या दिवशी सिद्ध योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. अशात आजचा बुधवारचा दिवस या ५ राशींना लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १९ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १९ जून २०२४

आज बुधवार १९ जून २०२४ रोजी, चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून ही तिथी प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाते. बुधवारी प्रदोष तिथी असल्याने ही तिथी बुध प्रदोष व्रत म्हणून ओळखली जाईल. बुद्ध प्रदोष व्रताच्या दिवशी सिद्ध योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार बुध प्रदोष व्रताच्या दिवशी ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.

मिथुनः 

आज दिवस लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. तुमच्यासमोर शत्रूंचे काही चालणार नाही. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. 

सिंहः 

आज वेगवेगळ्या संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील.

कन्याः 

आज प्रेम प्रकरणामध्ये तरुणांना यश येईल. परदेशी जाण्याचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अनेक सुधारणा कराल त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल. यश मिळाल्याने आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. 

वृश्चिकः 

आज भाग्याची चांगली साथ मिळेल. खर्चावर काटेकोरपणे नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहील. नोकरीची सुसंधी मिळेल. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. नोकरीत मोठ्या पदावर बदलीचे योग आहेत. मोठ्या अधिकाराची नोकरी मिळेल. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. 

मकरः 

आज ग्रह नक्षत्राच्या बदलात प्रदोष व्रताच्या दिनी मकर राशीच्या लोकांना दिवस भाग्याचा ठरेल. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.

WhatsApp channel