आज १९ जुलै २०२४ रोजी, गुरूच्या राशीत चंद्राचे भ्रमण धनु राशीत होत असून वृषभ राशीत गुरु आणि मंगळ एकत्र असल्यामुळे गुरु मंगल योग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या दिवशी गुरु मंगल योगासह रवियोग, ऐंद्र योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल. वाचा कोणत्या आहेत या लकी राशी.
आज कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. वेगवेगळ्या संधी मिळतील. जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. कामात उत्साह वाढणार आहे. व्यापारात आर्थिक फायदा होईल. निर्णय फायदेशीर ठरतील. मित्रमैत्रिणीं कडून सहकार्य लाभणार आहे.
आज प्रवासातुन आर्थिक लाभ होईल. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्मविश्वासात वाढ झाल्याने कोणतेही काम सहजतेने करु शकाल. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील.
आज कामाच्या ठिकाणी योग्य तेथे कर्तव्य निभावाल. कार्यक्षेत्रात वेळेचा चांगला सदुपयोग करून अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. कामकाजामध्ये वाढ होईल. विचारा अंतीच काळजी पूर्वक निर्णय घ्या. व्यापारात व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होणार आहे.
आज मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत. वेगवेगळ्या संधी चालून येतील. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढणार आहे. आर्थिक आवक वाढणार आहे.
आज किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होईल. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. कामात प्रगती होईल.
संबंधित बातम्या