आज शुक्रवार १९ जानेवारी रोजी, चंद्र मेष राशीत प्रवेश करत आहे आणि बुध, शुक्र आणि मंगळाचा संयोग धनु राशीतही तयार होत आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी असून, या दिवशी साध्य योग, शुभ योग, रवियोग आणि भरणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींवर लक्ष्मी प्रसन्न राहील, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
आज ग्रह-नक्षत्राची शुभ स्थिती नवीन प्रकल्पाच्या विस्तारासाठी फायदेशीर ठरेल . परदेशगमनाचे योग येतील. वारसाहक्काची प्रकरण मार्गी लागतील. घरातील कौटुंबिक वातावरण चांगले राहील. संततीची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल राहील. चांगल्या भावनेने काम करा. आपल्या अंगीभूत कलेसाठी चांगले वातावरण आहे. नोकरी व्यवसायात मनासारखे वातावरण लाभेल. नोकरी बदलायची इच्छा असणाऱ्यांना निर्णय घ्यायला शुभ दिवस आहे. व्यवसायातील वातावरण चांगले राहील, अचानक लाभ होण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक बाबतीत मदत मिळेल. यश निश्चित लाभेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीचा लाभ होईल. आर्थिक दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील. उत्पन्नाताचे स्तोत्र वाढविण्यात यश येईल. प्रत्येक काम फत्ते करणार आहात. प्रेमळ आणि परोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. परिस्थितीचा आढावा चांगला घ्याल. सामाजिक क्षेत्रात काम कराल. समाजात मान-सन्मान वाढल्याने आनंदी राहाल. नोकरीत बौद्धिक चातुर्याने आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. उद्योग व्यापार नफा लाभेल. व्यापारिक स्पर्धेत विजयी होण्याचे योग आहेत. कुंटुबातील वातावरण आनंददायी आणि सहकार्याचे राहील. आपली आर्थिक बाजु भक्कम राहील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत दिवस फायदेशीर आहे. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. रेंगाळलेली कामे गती घेतील. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. आनंदाची व समाधानाची बातमी ऐकायला मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विदयार्थ्यांची प्रगती होईल. संततीबद्दल समाधान व्यक्त कराल. जोडीदाराकडून आणि कुटुंबातील वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत पार पाडाल. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य उत्तम राहील. व्यापारात प्रगतीकारक दिवस असुन अचानक आर्थिक लाभ घडतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ बदलात यशप्राप्ती लाभेल. पैशाची कामे मनासारखी घडतील. संशोधन क्षेत्रात काम करणार्यांची प्रगती होईल. परिस्थितीचा उत्तम आढावा घ्याल व परिपूर्ण काम कराल. कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती-पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास फायद्याचे ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद प्राप्त होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. दिनमान उत्तम असल्याने अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
आज अत्यंत शुभ दिवस असेल. नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. यश प्राप्त होईल. नोकरदारास सलोख्याचे वातावरण अनुभवता येईल. धार्मिक अध्यात्मिक प्रसंगातून आत्मविश्वास मिळवू शकाल. नावलौकिक मिळेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल. पैशाची आवक चांगली राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या