आज सोमवार १९ ऑगस्ट रोजी, चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत जाणार आहे. तसेच आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे आणि या तिथीला रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि आज श्रावणाचा तीसरा सोमवार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी शोभन योग, गजकेसरी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ योगाचा लाभ मिळेल.
आज भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापाऱ्यांसाठी बर्याच संधी प्राप्त होतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल.
आज धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार व्यवसायात वृद्धी होईल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल.
आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात आर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. यशप्राप्तीचा दिवस आहे, मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात सहकार्य उत्तम ठरेल. सत्ताधारी प्रशासन यांच्या कडून सहकार्य लाभेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील.
आज आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे. गाठीभेटी होतील. काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.