आज बुधवार १८ सप्टेंबर रोजी, चंद्राचे गुरू ग्रहाच्या मीन राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे आणि या तिथीपासून १५ दिवसांचा पितृ पक्षही सुरू होतो आहे.
पितृ पक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात आणि या दिवसापासून पितरांच्या नावाने श्राद्ध विधी, तर्पण आणि दान केले जातात, ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो. पितृ पक्षाच्या पहिल्या दिवशी उभयचारी योग, वृद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे.
आज आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. परदेशगमन खूप फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत मात्र पैसा जास्त खर्च होणार आहे. प्रसिद्धीचे योग येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वडिलोपार्जित इस्टेटीतून वारसा हक्कातुन धनलाभ संभवतो. मान-सन्मान मिळेल. पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. आपणास आध्यात्मिक सुख उत्तम मिळेल. तिर्थक्षेत्री प्रवासाचा योग आहे.
आज समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. खरेदीस अनुकूल दिवस आहे. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्या. जुनी येणी वसूल होतील. घरामध्ये एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलून इतरांची मने जिंकाल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील.
आज आपल्या व्यक्तिमत्वात वाढ होईल. अनुकुल स्थिती राहणार आहे. कलाकारांना चांगला वाव मिळेल. लोकांची दाद चांगली मिळेल. आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल. निर्णयाचा फायदा होईल. मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
आज आर्थिक लाभ घडतील. लाभदायक दिवस आहे. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. मोठा आर्थिक लाभ होईल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामाचा दर्जा सुधारेल. तुमची विलक्षण छाप पडेल. नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्याची रूपरेखा आखली जाईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
आज आकस्मिक धनलाभाचा योग आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमतेने कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. वैवाहिक जीवनातले भांडण मतभेद दूर होऊ शकतील. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. सहकार्य लाभेल. परदेशगमनाचे योग आहेत. आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आनंदी व ऊत्साही राहाल.