मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky zodiac signs today : तुमची रास 'या' चार राशींपैकी एक असेल तर आजचा दिवस तुमचा!

Lucky zodiac signs today : तुमची रास 'या' चार राशींपैकी एक असेल तर आजचा दिवस तुमचा!

HT Marathi Desk HT Marathi
Sep 18, 2023 10:24 AM IST

Lucky zodiac signs today 18 september 2023 : काही राशींसाठी आजचा दिवस शुभसंकेत आणि भरभराट घेऊन आला आहे.

Lucky zodiac signs today
Lucky zodiac signs today

सिंह : आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. व्यवसायात आर्थिक लाभाचा योग आहे. मात्र, अतिउत्साह टाळावा लागेल. तुमच्या कार्यक्षेत्रात कुशलता दाखवाल आणि कर्तृत्वाला साजेसं काम करून दाखवाल. धाडसी निर्णय घ्याल. आज नवीन योजनेवर काम सुरू केल्यास फायदेशीर ठरेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. कुटुंबात शुभकार्याच्या दृष्टीनं तयारी सुरू होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पत्नी आणि मुलांशी उत्तम संवाद राहील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत मंडळींसाठी उत्तम दिनमान आहे. प्रवासातून आर्थिक लाभाचा योग आहे. शुभ रंग: लाल. शुभ दिशा: पूर्व.

ट्रेंडिंग न्यूज

वृषभ : दिनमान शुभ आहे. उद्योग व व्यवसायाचा विस्तार होईल. कुटुंबातील वारसा हक्काचे प्रश्न मिटतील. मालमत्तेच्या संबंधीचे निर्णय सकारात्मक होतील. कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरीतील जबाबदारीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय फायद्याचा ठरेल. रोजगाराच्या बाबतीत नवीन योजना आखल्यास ती यशस्वी होईल. वरिष्ठांकडून पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. हातातून निसटलेल्या संधी पुन्हा मिळतील. भागीदाराकडून चांगली साथ मिळेल. परदेश प्रवासाचा योग आहे. समाजात मान मिळेल. शुभ रंग: पांढरा. शुभ दिशा: वायव्य.

धनु : या राशीसाठी दिनमान उत्तम आहे. अध्यात्मची, ईश्वर भक्तीची ओढ लागेल. धार्मिक गोष्टीत मन रमले. तीर्थस्थळांच्या भेटीचा योग आहे. करीनिमित्त दूरवरच्या प्रवासाचा योग आहे. प्रवासातून लाभ संभवतात. मान्यवरांचा सहवास लाभेल. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. उपवरांचे विवाह जुळतील. व्यवसायात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. मनाला समाधान देणारी वार्ता कानी येईल. घरात मंगलकार्य धार्मिक कार्य घडतील. कुटुंबातील वडिलधाऱ्यांची आणि पत्नीची / पतीची साथ लाभेल. शुभ रंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य.

कर्क : आजच्या दिवशी हातात पैसा खुळखुळेल. रोजगारात यश येईल. दीर्घकालीन दृष्टीनं उत्तम कामं होतील. व्यावसायिक वातावरण चांगलं राहील. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. वारसा हक्काची प्रकरणं मार्गी लागतील. घरात आनंदाचं वातावरण राहील. नातेवाईकांशी उत्तम संवाद होईल. मित्रमंडळींच्या भेटीचा योग आहे. प्रवासाच्या दृष्टीनं हा काळ अत्यंत योग्य आहे. सरकारी कामकाज मार्गी लागेल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तारासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमचा दिवस अत्यंत उत्साही, आत्मविश्वासानं भरलेला असेल. मन प्रसन्न राहील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. त्यांचा सहवास लाभेल. आरोग्य ठणठणीत राहील. शुभ रंग: सफेद शुभ दिशा: वायव्य.

WhatsApp channel