Lucky Zodica Signs Today : आजच्या ग्रह-राशींच्या स्थितीनुसार, चंद्र कन्या राशीतून आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. सोबतच आज हर्षण योग व वणिज करण योग तयार होत आहे. या सर्व बदलांचा राशींवर शुभ-अशुभ प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये कोणत्या पाच राशींवर आज शुभ प्रभाव पडून त्या राशी लकी ठरणार ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे कार्य घडतील. आज चंद्र संक्रमण शुभ स्थानातून होत आहे. त्यामुळे कल्पनाशक्ती आणि दूरदर्शीपणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. मित्र मैत्रिणींमधील वादविवाद संपुष्टात येतील. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेच आहे. अति आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. गैरसमजाच्या गोष्टी मागे टाकून पुढे जाल तर सुखी व्हाल. एक प्रकारची प्रेरणा आतून निर्माण होईल. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. हा प्रवास फायदेशीर ठरेल.
आज शनिवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन योजनेच्यादृष्टीने लाभदायक दिवस आहे. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहेइस्टेटीतून वारसाहक्कातून धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. चंद्र रविच्या नक्षत्रातून संक्रमण करणार असून उत्कृष्ट बुद्धीमत्ता आणि अचाट स्मरणशक्ती असल्यामुळे हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याची वृत्ती आणि मुडी स्वभाव यामुळे तुम्ही जरा जगावेगळे भासाल. शिवाय काळाच्या पुढे विचार करण्याची वृत्ती राहील. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल.अडचणी येतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत यश खेचून आणण्यात यशस्वी व्हाल.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने तुमची प्रतिष्ठा आणखी वाढेल. एखाद्या महत्वाच्या कामात कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य घेतल्यास फलदायी ठरेल. उद्योग-व्यवसायात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. अचानक धनलाभाचा योग जुळून येत आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. खाजगी आयुष्याबाबत सांगायचे तर, पत्नी आणि मुलांसोबत संबंध आणखी दृढ होतील.लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळीना उत्तम दिवस आहे. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल. स्थावर इस्टेटीचे प्रश्न मात्र रखडण्याची दाट शक्यता आहे. निद्रानाशाचे विकार उद्भवण्याचीसुद्धा शक्यता आहे. याचे मुख्य कारण मानसिक ताणतणाव असू शकतो. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. मितभाषी स्वभावाने इतरांकडून कामे करून घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखाद्या क्षेत्रात पैसे गुंतवण्याचा विचार कराल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायक असणार आहे. आज तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग मोकळे होतील. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील. तसेच आज चंद्राचा केतुशी संयोग होत आहे. नोकरी व्यवसायात मनासारख्या घडणाऱ्या गोष्टींमुळे मन आनंदी राहील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी आणि मुलांसोबत संबंध चांगले राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. प्रोफेसर असणाऱ्यांना शुभदिवस आहे.सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. ज्यांचे परदेशात व्यवहार आहेत त्यांना तेथून चांगले संकेत मिळाल्यामुळे एखादी ट्रीप करावीशी वाटेल. आरोग्याबाबत उद्भवणारा त्रासाकडे दुर्लक्ष करु नका.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारीवर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी लागेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहिल. आपणास मेहनतीनुसार चांगल्या गोष्टी साध्य होतील. कौटुंबिक आयुष्य अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वाढविवाद मात्र टाळावेत.आज चंद्रबल उत्तम असल्याने लोकांना संघटित करण्याबाबत विशेष रूची ठेवाल. राजकारणी लोकांना आपल्या कामामध्ये अडथळे आले तरी चिकाटी ठेवून पुढे जाण्याची वृत्ती ठेवल्याने लाभ होईल. रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना मात्र प्रेमप्रकरणात अडथळे संभवतात.
संबंधित बातम्या