आज मंगळवार १८ जून २०२४ रोजी, चंद्र तूळ राशीत प्रवेश करत आहे आणि मिथुन राशीमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे. तसेच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी त्रिपुष्कर योग, त्रिग्रही योग, शिवयोग, सिद्ध योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी शुभ योग तयार झाल्यामुळे ५ राशींना लाभ होणार आहे. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.
आज ग्रहांची साथ चांगली मिळेल. व्यापारीवर्गास आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. व्यवसायात ठरवलेले उद्दीष्ट पूर्ण कराल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होईल.
आज शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील.
आज नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. उदार वृत्तीमुळे ओळखीही जास्त होतील. प्रेमी जनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी राहाल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल.
आज ग्रह नक्षत्राच्या शुभ स्थितीत फायदे मिळवाल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे.
आज मनावरचा ताण बर्या पैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. त्यांच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे निश्चित शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे.
संबंधित बातम्या