आज गुरुवार १८ जानेवारी रोजी, चंद्र मंगळच्या मेष राशीत प्रवेश करेल आणि मंगळ आणि बुध नंतर शुक्र देखील धनु राशीत प्रवेश करेल. तसेच आज पौष मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी साध्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. तसेच, मासिक दुर्गाष्टमी असून आज ५ राशींवर देवीची कृपा राहील. जाणून घ्या या ५ नशीबवान राशी कोणत्या आहेत.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात रोजगारात समाधानकारक स्थिती राहील. व्यवसायात वृद्धी होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. संततीच्या महत्वाच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. कुटूंबातील अडचणी दूर होतील. पत्नी नोकरीत असेल तर प्रमोशन बढतीचे योग आहेत. मानसिक स्वास्थ उत्तम राहील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. धार्मिक वृत्ती राहील. लाभदायक गोष्टी घडतील. उत्तम महत्त्वाकांक्षा ठेवाल. आत्मविश्वासही वाढेल. घरामध्ये मंगलकार्य ठरतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत मन प्रसन्न राहील. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा मानसन्मान वाढेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य मिळाल्याने उत्साह वाढेल. लेखनाचा नवा बाज निर्माण करता येईल. तुमच्या गुणांना वाव मिळेल. आपली प्रतिभा उंचावेल. दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. नोकरीतील बदल फायदेशीर ठरतील. नोकरीत कामाच्या ठिकाणी आपली प्रशंसा कौतुक केले जाईल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. बऱ्याच जणांना प्रसिद्धीच्या झोतात येण्याची संधी मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगसंयोगात आर्थिक प्रश्न सुटतील. कलाकारांना चांगल्या संधी मिळून त्यांच्या कलेला वाव मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. मित्र नातेवाईक आप्तेष्टाकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात मंगलकार्याचे आयोजन केले जाईल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या बदलात घरासंबंधी अडचणी संपतील. दिवसभर मन प्रसन्न राहील. व्यापारात नवीन योजनेवर विचार कराल. वाचन लिखाण करायला सवड मिळेल. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची धमक येईल. बदलीचे शुभ योग आहेत. तुमच्या नवीन कल्पना आणि विचारांचे स्वागतच होईल. रोजगारात स्पष्ट धोरणामुळे अनुकूलता निर्माण होईल. दिवसभरात आशाजनक परिस्थिती निर्माण होईल. नोकरीत नवीन जबाबदादी पार पाडाल. व्यवसायात नफा वाढेल. शेअर बाजार आणि विमामुळे लाभ होतील. मालमत्ता खरेदी अचानक घडेल. व्यवसायानिमित्त परदेश प्रवास होतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ लाभामुळे आत्मविश्वास वाढेल व ध्येयावर प्रेम कराल. सामाजिक राजकीय क्षेत्रात पुढे जाल. आर्थिक आवक उत्तम असेल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक सुधारणा जाणवेल. पुर्वीचे प्रकल्प व कामे आज आपणास मदतीला येणार आहेत. कामाप्रती विशेष ओढ निर्माण होईल. आपल्या हातून शुभ कार्य घडतील. वारसाहक्काचे व्यवहार मार्गी लागतील. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींसोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. समोर आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्याल. नव्या खरेदीने कुटुंबात आंनदी वातावरण राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)