Lucky Zodiac Signs : प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील, फायदेशीर काळ! या ५ राशीच्या लोकांसाठी लकी रविवार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील, फायदेशीर काळ! या ५ राशीच्या लोकांसाठी लकी रविवार

Lucky Zodiac Signs : प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील, फायदेशीर काळ! या ५ राशीच्या लोकांसाठी लकी रविवार

Published Aug 18, 2024 08:35 AM IST

Lucky Rashi Bhavishya 18 August 2024 : आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि उत्तराषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. आजचा दिवस ५ राशींसाठी लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १८ ऑगस्ट २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य १८ ऑगस्ट २०२४

आज रविवार १८ ऑगस्ट रोजी, चंद्र शनीच्या राशीत मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि उत्तराषाध नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.

मिथुन: 

आज नवे मार्ग आपणास सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आपल्यास फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. व्यापारात उत्पन्न वाढेल. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. 

कर्क: 

आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. मनाप्रमाणे खरेदी कराल. राजकिय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची विद्याभासातात प्रगती पाहून समाधान होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल.

सिंहः 

आज कला दाखवण्याची संधी मिळेल. नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिक जोडिदार भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. कुटुंबात मंगलकार्याची रुपरेखा नियोजन कराल. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. 

तूळ: 

आज पैशाची आवक चांगली राहील. प्रेम प्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेमप्रकरणात संबंध दृढ होतील. 

वृश्चिक: 

आज वेळेचे महत्त्व जपाल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धनलाभाचा दिवस आहे. 

 

Whats_app_banner