Lucky Zodiac Signs : जुनी येणी वसूल होतील, कृपा होईल! या ५ लकी राशींसाठी शुभ दिवस-lucky zodiac signs today 17 september 2024 astrology predictions for vrishabh kark kanya dhanu meen rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : जुनी येणी वसूल होतील, कृपा होईल! या ५ लकी राशींसाठी शुभ दिवस

Lucky Zodiac Signs : जुनी येणी वसूल होतील, कृपा होईल! या ५ लकी राशींसाठी शुभ दिवस

Sep 17, 2024 09:33 AM IST

Lucky Rashi Bhavishya 17 September 2024 : आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथी असून, या दिवशी रवि योग, धृतिमान योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, आजचा दिवस या ५ लकी राशीच्या लोकांसाठी शुभ आहे.

नशीबवान राशी १७ सप्टेंबर २०२४, लकी राशीभविष्य
नशीबवान राशी १७ सप्टेंबर २०२४, लकी राशीभविष्य

आज मंगळवार १७ सप्टेंबर रोजी, चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जाणार आहे, यामुळे चंद्र आणि मंगळ एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात स्थित आहेत, यामुळे चंद्र मंगळ नवमपंचम योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या तिथीला अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जात आहे आणि महालयारंभही या दिवसापासून सुरू होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवि योग, धृतिमान योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे.

वृषभः 

आज जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जुनी येणी वसूल होतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. 

कर्क: 

आज दिवस शुभ आहे. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. शासकीय कामकाजातून यश मिळेल. योजनेतून लाभ होतील. व्यापार नविन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. गृहसौख्य पत्नीकडून सहकार्य मिळेल. संततीची विद्याभ्यासात रुची वाढेल. 

कन्या: 

आज कृपा कारक दिवस आहे. मनोबल उंचावलेले असेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

धनु: 

आज भाग्योदयकारक दिनमान आहे. आपल्याला यश मिळेल. व्यवसायात नवीन ऑर्डर्स मिळतील. आध्यात्मिक उन्नती होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. मानसिक स्वास्थ लाभेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील.

मीनः 

आज मानसिक स्वास्थ लाभेल. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. विरोधकांची मने जिंकाल. भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. 

Whats_app_banner