आज गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी, चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा असून या दिवशी हर्षण योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग या ५ राशींना लाभदायक ठरणार आहे.
आज खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. दुरवरच्या प्रवासातुन लाभ होतील. प्रयत्नाला यश मिळेल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील.
आज गृहस्थी सौख्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कामात कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आज यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. सहकार्य लाभणार आहे. आकस्मिक धनलाभ होईल.
आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. भरभराटीचा दिवस आहे. भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल. मित्रमैत्रिणीच्या नातेवाईकांच्या सहकार्याने नवीन योजनेवर कार्य कराल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल.
आज आत्मविश्वास द्विगुणित होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. इच्छित फळ मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल.
आज नवीन जबाबदारी मिळेल. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. व्यापारी वर्गाकरीता महत्वाचा योग आहे. प्रवासातून देखील लाभ होईल. नोकरदार बढती प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. घरगुती सुविधेत वाढ होईल. वरिष्ठाची मदत मिळेल. संधीचं सोनं करा. कामात यश प्राप्त होईल. आज उत्पन्नात वाढ होणार आहे.
संबंधित बातम्या