मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : उत्तम ग्रहमानात तुमची विलक्षण छाप पडेल! 'या' ५ राशींना आजचा दिवस लकी राहील

Lucky Zodiac Signs : उत्तम ग्रहमानात तुमची विलक्षण छाप पडेल! 'या' ५ राशींना आजचा दिवस लकी राहील

Jun 17, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 17 June 2024 : ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलाने आज शिवयोग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. अशात आजचा सोमवारचा दिवस या ५ राशींना लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य

आज सोमवार १७ जून २०२४ रोजी, चंद्र शुक्र ग्रहाच्या तूळ राशीत भ्रमण करत आहे. तसेच ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असून, या दिवशी शिवयोग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होईल. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.

कर्कः 

आज ग्रह नक्षत्राच्या शुभ संयोगात आजचा सोमवारचा दिवस, विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. 

वृश्चिकः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. नातेवाईकांकडून शुभ समाचार ऐकायला मिळतील. व्यापारात नविन योजना आखाल त्या फायदेशीर ठरतील. घरगुती वातावरण सलोख्याचे राहील.

मकरः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. दिवस मंगलमय आहे. घरातील वाद संपुष्टात येऊन गृहसौख्यात भर पडेल. प्रेम प्रकरणात यश येईल. लोकप्रियता समाजकारणाची आवड असल्यामुळे जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. लेखक वर्गास साहित्यिक क्षेत्रात किर्ती व मान सन्मान मिळेल. 

कुंभः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगात किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडू शकतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून, आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. 

मीनः 

आज ग्रह नक्षत्राच्य योग संयोगात कौटुंबिक समस्या दूर होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ व प्रगती होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. मन समाधानी राहील. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. 

WhatsApp channel