आज १७ जुलै २०२४ रोजी, चंद्राचे मंगळच्या वृश्चिक राशीत भ्रमण होणार आहे. तसेच नवमपंचम योग तयार होत आहे. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे आणि ही तिथी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते आणि चातुर्मास २०२४ देखील या दिवसापासून सुरू होत आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, बुद्धादित्य योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज कोणत्या राशींवर विठ्ठलाची कृपा राहील, जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहे.
आज यशस्वी होतील. मनःशांती मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नाव लौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. इच्छित फळ मिळणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल.
आज आषाढी एकादशीच्या दिवशी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. झालेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्या कडून सहकार्य लाभेल.
आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे.
आज प्रगतीकारक ग्रहमान आहेत. धंद्यात वाढ होईल. धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. कष्टाच्या मानाने लाभ कमी मिळेल. आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वृद्धी होईल. तुमची पदोन्नती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. अधिक लाभ होईल.
आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी राहाल. अनुकुल फळ प्राप्त होतील.
संबंधित बातम्या