मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs:कार्यक्षेत्रात उत्साह व उद्योग क्षेत्रात तेजीचे वातावरण, या ५ राशींचे नशीब पालटेल

Today lucky zodiac signs:कार्यक्षेत्रात उत्साह व उद्योग क्षेत्रात तेजीचे वातावरण, या ५ राशींचे नशीब पालटेल

Jan 17, 2024 01:42 PM IST

Lucky Rashi Today 17 january 2024: आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग ५ राशींसाठी भाग्यदायक राहील. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत ज्यांना आजचा दिवस लाभदायक व नशीबाची साथ देणारा ठरेल.

lucky zodiac signs today 17 january 2024
lucky zodiac signs today 17 january 2024

आज बुधवार १७ जानेवारी रोजी, मीन राशीनंतर चंद्र मेष राशीत प्रवेश करेल. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी शिवयोग, सिद्ध योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. अशात ५ राशींसाठी हा उत्तम दिवस असून, नशीब पालटेल.

मेषः 

आज नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यापार व्यवसायात एखादे काम हवे असेल तर उच्चपदस्थ लोकांच्या मध्यस्थीने कामे लवकर होतील. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. प्रसिद्धीचे योग येतील.कलाकार आणि खेळाडूंना चांगल्या संधीचा लाभ होईल. प्रत्येक गोष्टीचे उत्तम चिंतन कराल. यश मिळेल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर मान-सन्मानही मिळेल. जमिन विक्रीतून फायदा होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल.

वृषभः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात सार्वजनिक कार्यात पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नवनविन संधी मिळणार आहेत. नोकरी व्यापारात सरकारी कामकाजामुळे काही कामे अडली असतील तर ती पूर्ण होतील. काही सवलती मिळायच्या असतील तर त्या मिळून जातील. व्यवसायात गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी खास योजना आखाल. प्रमोशनही मिळू शकते. विद्यार्थ्यांचा तणाव कमी होईल व स्पर्धात्मक यश मिळेल.  कलाकारांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. 

मिथुनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना विविध संधी मिळतील. घरातील वातावरण सुधारेल. नोकरीत अधिकार मिळेल. राजकारणात भावनेपेक्षा बुद्धीच्या कसरतीचा उपयोग जास्त होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास यश मिळेल. पूर्वी मांडलेले आर्थिक आडाखे यशस्वी होतील. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहे. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. 

धनुः 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ योगामुळे आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. जुन्या मित्र-मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत. चैनीने जगावेसे वाटेल. घरामध्ये मंगलकार्ये ठरतील. त्यासाठी उत्तमोत्तम खरेदी कराल. जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल.

कुंभः 

आज ग्रह-नक्षत्रातील बदल लाभदायक ठरतील. तुमच्यासमोर शत्रूंना पराभव स्विकारावा लागेल. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद येईल. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक तेजी राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी-विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म पूजापाठ असे धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. अध्यात्मिक उन्नती साधाल.

WhatsApp channel