आज शनिवार १७ ऑगस्ट रोजी, चंद्र धनु राशीनंतर मकर राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज श्रावण मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या तिथीला शनि प्रदोष व्रत केले जाणार आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी प्रीति योग, आयुष्मान योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
आज अनुकुल फळ प्राप्त होईल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. पैसा निश्चित मिळणार आहे. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायात यश मिळाल्याने आनंदी राहाल.
आज रोजगारात तुमची प्रगती होईल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. धंद्यात वाढ होईल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वाढ होईल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. उत्तम दिवस आहे.
आज यशस्वी व्हाल. मनःशांती मिळेल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. व्यापारात आर्थिक लाभ होणार आहे. इच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. दिवस यशप्राप्तीचा आहे. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात नाव लौकिकता प्राप्त होईल.
आज ग्रह नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात चांगले सहकार्य मिळणार आहे. जमीन बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. जुनी घेणी वसुल होतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. सत्ताधारी प्रशासन यांच्या कडून सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर व लाभदायक होतील.
आज आकस्मिक धनलाभाचा योग आहे. काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील.