आज सोमवार १६ सप्टेंबर रोजी, चंद्र शनिदेवच्या कुंभ राशीच्या मूळ त्रिकोण स्थानी भ्रमण करत आहे, जिथे चंद्राचा शनिशी संयोग होईल. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी रवियोग, सुकर्मा योग आणि धनिष्ठा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. अशात या ५ लकी राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल. या राशींची अपूर्ण कामे सहज पूर्ण होतील.
आज मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. नोकरीत व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. कामानिमित्त देश-विदेशात फिरण्याची संधी मिळेल. जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. लग्न करू इच्छित असणाऱ्याचे विवाह जुळतील.
आज आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. वैवाहीक जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायक राहील. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.
आज आर्थिक लाभ होईल. आनंदी वातावरण राहील. बौद्धीक गोष्टींकडे ओढ राहील. योग्य मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचे प्रश्न बरेचसे मार्गी लागतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. विदेश भ्रमणाचे योग आहे. प्रवासातुन आर्थिक लाभ घडतील. पदप्राप्ती मान-सन्मान वाढेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आपल्याला सहकार्य लाभेल.
आज कर्ज मंजूर होईल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी मिळेल व मानधनात वाढ होईल. मनोबल वाढवणारा दिवस राहील. कामाचे कौतुक होऊन मान-सन्मान वाढेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. कोणतेही काम पूर्ण होण्याचा योग आहे.
आज आकस्मिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. नशिबाची साथ चांगली मिळेल. कामावर समाधानी असाल. शुभ दिनमान आहे. व्यापारात आर्थिक लाभ होतील.जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे.