Lucky zodiac signs today : 'या' ५ राशींसाठी आजि आनंदाचा दिनु-lucky zodiac signs today 16 september 2023 mesh kanya vrishabh kark tula rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky zodiac signs today : 'या' ५ राशींसाठी आजि आनंदाचा दिनु

Lucky zodiac signs today : 'या' ५ राशींसाठी आजि आनंदाचा दिनु

HT Marathi Desk HT Marathi
Sep 16, 2023 10:50 AM IST

Lucky zodiac signs today 16 september 2023 : साम श्रावणी आणि शुक्ल योग काही राशींसाठी खूपच लाभदायक आहे. कोणत्या आहेत या राशी? चला जाणून घेऊया…

Lucky zodiac signs today
Lucky zodiac signs today

मेष : आजि आनंदाचा दिनु असंच मेष राशींच्या व्यक्तींबाबत म्हणावं लागेल. आज सर्व प्रकारच्या सहकार्याचा लाभ होण्याचा योग आहे. मनोधैर्य उंचावलेले असेल. आरोग्य ठणठणीत राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची, निर्णयांची प्रशंसा होईल. पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. व्यावसायिक मंडळींना नवी व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. ते लाभदायक देखील ठरतील. कौटुंबिक वातावरण छान राहील आणि भावाबहिणींकडून सहकार्य मिळेल. प्रवासातून लाभाचा योग आहे. शुभकार्याला हजर राहण्याची संधी मिळेल. मानसन्मान मिळेल. शुभ रंग: केसरी शुभ दिशा: दक्षिण.

वृषभ : या राशीसाठी आज अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. कौटुंबिक, सामाजिक व व्यावसायिक पातळीवर उत्तम दिवस असेल. विधायक कामात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून साथ मिळेल. थोरामोठ्यांचा मान राखाल. त्यांच्याकडून कौतुक वाट्याला येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणं पथ्यावर पडेल. अध्यात्माची गोडी लागेल. हातून धार्मिक कार्य होतील. प्रवासातून लाभ संभवतो. गूढशास्त्राची आवड निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात कर्तृत्वाची गाजवण्याची संधी मिळेल. गुणी व्यक्तींचा सहवास लाभेल. शुभ रंग: सफेद. शुभ दिशा: वायव्य.

कर्क : गुंतवणकीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देईल. कुटुंबात सौख्य राहील व वाढेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान मिळाल्यानं उत्साह, आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिकांच्या बाबतीत नव्या घटना घडतील. धनलाभाचा योग आहे. विविध मार्गांनी पैसे येतील. मित्रमंडळी भेटतील. त्यांच्याकडून उत्तम साथ लाभेल. मुलांसाठी चांगला दिवस आहे. प्रवासाचा योग आहे. नोकरीत नव्या योजनांवर काम सुरू कराल. मन नव्या विचारांनी भारून जाईल. शुभ रंग : गुलाबी शुभ दिशाः वायव्य.

कन्या : दिनमान शुभ आहे. आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर पडतील. महिलांसोबतचा वर्तन-व्यवहार आदरयुक्त असावा. अहंकारी स्वभावाला फार डोकावू देऊ नका. वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. यश निश्चित लाभेल. नव्या कल्पना मांडा, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यावसायिकांना अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. कुटुंबात समाधानी वातावरण राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. प्रेमप्रकरण दृढ होतील. मानसिक समाधान लाभेल. शुभ रंगः हिरवा शुभ दिशाः उत्तर.

तुला : आजचा दिवस यशदायी आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात चांगल्या कामाचं आयोजन केलं जाईल. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. वारसा हक्काचा तिढा सुटेल. अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींचा सहवा लाभेल. त्यांच्याकडून सकारात्मक विचार मिळतील. आज केलेली मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रमांवर काम सुरू होईल. कौटुंबिक पातळीवर मनाजोग्य घटना घडतील. नवीन वाहन खरेदीचा योग आहे. शुभ रंगः नारंगी शुभ दिशाः दक्षिण.

Whats_app_banner