Lucky Zodiac Signs : महालक्ष्मी योग, धनवृद्धी होईल! या ५ लकी राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहील
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : महालक्ष्मी योग, धनवृद्धी होईल! या ५ लकी राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहील

Lucky Zodiac Signs : महालक्ष्मी योग, धनवृद्धी होईल! या ५ लकी राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखी राहील

Oct 16, 2024 09:24 AM IST

Lucky Rashi Bhavishya 16 October 2024 : आज आश्विन मासातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी असून, शरद पौर्णिमेच्या दिवशी ध्रुव योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र, महालक्ष्मी योगाचा शुभ संयोग तयार होत आहे, अशात या ५ राशीच्या लोकांना धनवृद्धी होईल.

लकी राशीभविष्य
लकी राशीभविष्य

आज बुधवार १६ ऑक्टोबर रोजी, चंद्र गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि दोन शुभ ग्रह म्हणजे शुक्र आणि बृहस्पति समोरासमोर आहेत म्हणजेच सातव्या दृष्टीतून एकमेकांकडे पाहत असल्याने महालक्ष्मी योग तयार होत आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी असून, ही तिथी कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. शरद पौर्णिमेच्या दिवशी ध्रुव योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र, महालक्ष्मी योगाचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी ५ राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल.

मेषः 

आज आनंददायक घटना घडतील. आर्थिक लाभ होतील. मनस्वास्थ उत्तम राहील. तुमची कामे सहजगत्या होणार आहेत. नशिबाची साथ चांगली मिळेल. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. 

मिथुनः 

आज काम करण्याचा उत्साह वाढेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ राहील. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक बाबतीमधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. रखडलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. केलेल्या योजनात यशस्वी व्हाल. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. संततीच्या प्रश्नामध्ये निर्णायक यश मिळेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल.

कन्याः 

आज कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. दिवस उन्नती कारक आहे. मनात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायक राहील. आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. धनवृद्धी होईल. 

तूळ: 

आज आर्थिक वृद्धी होईल. देश-विदेशात फिरण्याची संधी मिळेल. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल. प्रेमप्रकरणात स्नेह वाढेल. विवाह बद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. आरोग्यही उत्तम राहील. शुभ दिनमान असेल.

धनु: 

आज मन प्रसन्न राहील. आनंदी दिवस आहे. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून ते प्रश्न व्यवस्थित हाताळाल. आर्थिक स्त्रोत वाढेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. वैवाहीक जीवन सुखी राहील.

Whats_app_banner