आज गुरुवार १६ मे २०२४ रोजी, चंद्र सूर्याच्या सिंह राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची नववी तिथी असून या तिथीला सीता नवमीचा उत्सव साजरा केला जातो. सीता नवमीच्या दिवशी रवियोग, ध्रुव योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार सीता नवमीच्या दिवशी या ५ राशीच्या व्यक्तिंना दिवस लाभदायक ठरणार आहे.
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वारसा हक्काने धनलाभ होऊ शकतो. कमी कष्टात जास्त पैसा मिळण्याची कला अवगत होईल. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. नवमपंचम योग पाहता राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि काम करण्यास उत्साह येईल. आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांचे तुमच्याविषयी चांगले मत असेल. महत्वाची कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. एखाद्या शुभकार्यात सामील व्हाल. समाजात मानसन्मान मिळेल. मनासारखे यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यापारीवर्गास मोठी आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेऊ नका. महत्त्वाकांक्षा वाढल्याने असमाधान निर्माण होईल. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.
कर्क राशीच्या लोकांना कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातून आर्थिक लाभ होईल. परदेशभ्रमणाची शक्यता आहे. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचार पूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामा प्रती सजग रहा. आळस दुर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. वैचारिक दृष्टिकोनातून अनेक कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या बाबतीत इतरांवर अवलंबून राहाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी प्राप्त होतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील.
व्यापारात फायदा होईल. जोखमीच्या व्यवहारात मात्र सावधानी बाळगा. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढ़तीची संधी आहे. कल्पना शक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. व्यसनापासून दूर रहा. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. कला क्षेत्रातील मंडळींनी या शुभ दिवसाचा फायदा करून घ्यावा. पत्नीकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल.आज मघा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण पाहता घरात किंवा घराबाहेर वादविवाद निर्माण झाले तर तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वास सिद्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची रेंगाळलेली कामे मात्र पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत.
मकर राशीच्या लोकांसाठी कुटुंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून तुमच्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. स्वभावातील रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची लौकिकता वाढेल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे.आज चंद्र हर्शल नवमपंचम योगात नवीन योजना यशस्वी होतील. कामात थोडे धाडस दाखवा. आपल्या महत्त्वाकांक्षी योजनांचे नियोजन चाणाक्षपणे कराल व त्यात यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे.
व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल. नोकरीत आपण घेतलेले निर्णय योग्य राहतील. भावंडांकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आज ग्रहांचा नवमपंचम योग पाहता करियरमध्ये नवी उंची गाठाल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या विषयामध्ये जितके ज्ञान असेल त्याप्रमाणे पैसा निश्चित मिळणार आहे. त्या दृष्टीने पुढे जायला हरकत नाही. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. अनुकुल लाभ प्राप्त होईल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता शुभ योग आहे.
संबंधित बातम्या