मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs Today 16 March 2023 : आर्थिक बाबतीत लाभ संभवतो, व्यापारात योजना यशस्वी होतील
आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Lucky Zodiac Signs Today 16 March 2023 : आर्थिक बाबतीत लाभ संभवतो, व्यापारात योजना यशस्वी होतील

16 March 2023, 6:26 ISTDilip Ramchandra Vaze

Today Lucky Zodiac Signs : आज काही राशी अत्यंत सुंदर अशा दिवसाला सामोरं जाणार आहेत. आज नोकरी असो किंवा व्यवसाय कोणत्याही क्षेत्रात असाल तरीही तिथे यश तुमच्यासोबत असणार आहे. आजच्या दिवसाचा आनंद घेण्याचा काही राशींना योग आहे.

राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज गुरूवार १६ मार्च  २०२३. आजच्या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया.

ट्रेंडिंग न्यूज

आजच्या नशीबवान राशी

कर्क रास

नोकरदारांसाठी चांगला दिवस आहे. महत्वाची कामं हाती येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. काहींना बढती मिळेल. प्रेमसंबंध वृद्धींगत होतील. काही चांगल्या कामांची मुहूर्तमेढ आपल्या हातून होण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभल्याने दिवस आणखीनच चांगला जाईल. मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. काही संशोधनात्मक कार्यही घडण्याची शक्यता आहे.

शुभरंग: सफेद

कन्या रास

संशोधनात्मक कार्यास पुरस्कार मिळतील. भावंडांकडून उत्तम सहकार्य लाभेल. अचानक धनलाभ होईल. नोकरीत कर्तृत्व दाखवण्याची चांगली संधी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचं असेल. काही जुनी येणी वसूल होतील. आज गुरुची कृपा तुमच्यावर राहील. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभही होऊ शकतो. विद्यार्थी आज विद्याभ्यासात चांगली प्रगती करतील.

शुभरंग: हिरवा

मकर रास

आज विरोधकांवर मात करु शकाल. नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे, सहाजिकच पगारवाढ संभव आहे. व्यापारात मात्र विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. मात्र त्यातही विरोधकांवर आपल्या कार्याने मात करु शकाल. मित्रमैत्रिणी आज साथ देतील. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मात्र वाहनं जपून चालवण्याचा सल्ला दिली जातो.

शुभरंग : निळा

मीन रास 

आज तीर्थयात्रा कराल. नोकरीत दूरवरचे प्रवास संभव आहेत. हे प्रवास आर्थिकदृष्ट्या लाभकारक आहेत. आपल्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा सहवास लाभेल. विवाह इच्छूकांचे विवाह जुळतील. घरात धार्मिक वातावरण राहील. व्यापारात काही डावपेच आखल्यास ते यशस्वी होतील. घरातलं वातावरण आनंददायी राहील.

शुभरंगः पांढरा

विभाग