आज रविवार १६ जून २०२४ रोजी, मिथुन राशीमध्ये बुध आणि शुक्र एकत्र असल्यामुळे धन लक्ष्मी योग तयार होत असून, कन्या राशीनंतर चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी असून या दिवशी धन लक्ष्मी योगासोबत सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार तयार होत असलेला शुभ योग कोण-कोणत्या राशींना फायदेशीर ठरेल. जाणून घ्या आजच्या लकी राशी कोणत्या आहेत.
आज अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. जनमानसावर तुमची विलक्षण छाप पडेल. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. किर्ती व मान सन्मान मिळेल.
आज रखडलेली कामे मार्गी लागतील. तुमच्यातील सद्गुणांची लोक कदर करतील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेश गमनाचे योग येतील. त्यामुळे फायदाही होईल. उत्तम ग्रहमानात अध्ययन आणि अध्यापन यामध्ये विशेष गोडी घ्याल. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मन समाधानी राहील.
आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढीस लागेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगती कारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल.
आज मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा.कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजकिर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. स्वतंत्र विचार कराल आणि ते अमलातही आणाल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचे योग आहे. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील.