आज १६ जुलै २०२४ रोजी, चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी असल्याने या दिवशी साध्ययोग, रवियोग, शुभ योग आणि विशाखा नक्षत्राचा शुभ योग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या शुभ योगात आजचा मंगळवार या ५ राशींसाठी लकी राहील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात मनावरचा ताण कमी झालेला असेल. कुटुंबातील लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल. उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मानाच्या जागा मिळतील. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल.
प्रमोशन मिळण्याचे योग येतील. व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणीं कडून लाभ होतील. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल.
आज आर्थिक प्रगती होईल. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एखादी मस्त खरेदी करण्याचा मूड राहील. नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे.
आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजी राहील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल.
आज करिअर मध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणाच्या जोरावर बाजी मारून न्याल. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. परदेशाशी व्यवहार असणाऱ्यांना दिवस फायदेशीर ठरेल. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदारा कडून सहकार्य लाभेल. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.
संबंधित बातम्या