आज मंगळवार १६ जानेवारी रोजी, चंद्र गुरूच्या मीन राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून, या दिवशी शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशींसाठी संक्रांत करिदिन नशीबाला कलाटणी देणारा ठरेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना वेगवेगळ्या संधीचा लाभ होईल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. पूर्वी केलेल्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळेल. हाताखालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल. आध्यात्मिक प्रगती चांगली होईल. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. महत्वाची कामे हाती असतील तर पूर्ण होतील. काम करताना उत्साह राहील. जबाबदारी वाढतील. व्यापारात आर्थिक फायदा होईल. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. स्थावर मालमत्ता संपत्तीचे प्रश्न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. एकंदरित कामकाजासाठी दिवस शुभ राहील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगसंयोगात चांगली खरेदी कराल. सर्व आनंदी राहतील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. नोकरी व्यवसायात अचानक फायदा होईल. धार्मिकतेकडे जास्त कल राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. प्रभावशाली व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. आत्मविश्वास वाढल्याने कोणतेही काम सहज पूर्ण कराल. सरकारी काम वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. प्रवासातुन आर्थिक लाभाचे योग आहेत.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ स्थितीचा फायदा कामात होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ राहील. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य ते कर्तव्य पार पाडाल. कार्यक्षेत्रात वेळेचा सदुपयोग करून स्वप्न पूर्ततेच्या दृष्टीने काम कराल. व्यवसाय फायदेशीर राहील. महत्वकांक्षा पूर्ण होतील. यश मिळवल्याने उत्साह वाढेल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घडतील. ज्यांच्या भविष्यात फायदा होईल. कार्यक्षेत्रात यशाचा दिवस आहे. मुलांकडून समाधान लाभेल. आज आर्थिक नफा होईल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विविध संधीचा उपभोग घेता येईल. व्यापारात नवीन कार्याची योजना आखाल. नोकरीतील नवीन योजना भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढेल. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून आर्थिक नफा वाढेल. मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याचे योग मिळेल. व्यापार चांगला चालेल. भौतिक सुख साधनांची आवड निर्माण होईल. योजनेनुसार काम केल्यास फायदा होईल. आईवडिलांशी असलेले संबंध दृढ होतील.
आज शुभ योगाचा प्रभाव वडिलोपार्जित धंद्यामध्ये वृद्धी कराल. किर्ती प्रसिद्धीचे योग येतील. नवीन नोकरी लागू शकते. वैवाहिक जीवनात सामंजस्य राहील. रोजगारात स्वतःचे निर्णय महत्वपूर्ण राहतील. सामाजिक कार्यात सक्रीय भूमिका राहील. व्यापार रोजगार चांगला चालेल. संततीसंबंधी कामात प्रगती होईल. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. व्यवसायात बरीच उलाढाल कराल. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते. घरामध्ये छोट्या समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांच्या भेटी होतील. उद्योग व्यापारात कार्यक्षेत्र विस्तारेल. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ होतील. आत्मविश्वास वाढल्याने अडचणींवर मात कराल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या