आज शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी, चंद्राचे गुरूच्या धनु राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला पुत्रदा किंवा पवित्र एकादशीचे व्रत केले जाते. आजच वरदलक्ष्मी व्रतही आहे, आजच्या दिवशी प्रीति योग, लक्ष्मी नारायण योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार पुत्रदा एकादशीच्या दिवशी शुभ योग तयार झाल्याने ५ राशींना लाभ होणार आहे.
आज अनुकुल फळ प्राप्त होतील. कार्यक्षेत्रात ठोस निर्णय घेऊ शकाल. पैसा निश्चित मिळणार आहे. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. व्यावसायिक किवा खाजगी कामासाठी प्रवास घडेल. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारी वर्गासाठी बर्याच संधी प्राप्त होतील. व्यापारात नवीन बदल प्रयोग यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. व्यवसायातील यश मिळाल्याने आनंदी रहाल.
आज गुंतवणूक फायदेशीर ठरेल. संततीच्या धाडसाचे कौतुक ऐकायला मिळेल. धंद्यात वाढ होईल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. रोजगारात तुमची प्रगती होईल. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापार वर्गाची व्यवसायात वृद्धी होईल. प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. प्रयत्नाच्या तुलनेने अधिक लाभ होईल.
आज आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. पैशाची अडकलेली कामे पार पडतील. याबाबत मध्यस्थ म्हणून जवळच्या मित्राचा खूप उपयोग होईल. मोठ्या भावंडांची साथ चांगली मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ योग निर्माण होत आहेत. व्यापारात फायदा होईल. कल्पना शक्तीला वाव मिळेल. कौटुंबिक स्नेह निर्माण होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीची संधी आहे.
आज मनःशांती मिळेल. यशस्वी व्हाल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. प्रवासाचे बेत ठरतील. नोकरीत आत्म विश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्त्रोत निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होणार आहे. कुटूंबात स्नेह वाढेल. दिवस यशप्राप्तीचा आहे मोठे आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. इच्छित फळ मिळणार आहे.
आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कुटूंबातील सदस्याचे आपल्या विषयी चांगले मत असेल. कामे करताना वेळेचे नियोजन कराल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल.