आज रविवार १५ सप्टेंबर रोजी, चंद्र शनिदेवाच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत म्हणजेच मकर राशीनंतर कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या तिथीला रवि प्रदोष व्रत केले जाणार आहे. रवि प्रदोष व्रताच्या दिवशी सूर्याकडून अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावी वेशी योग तयार होत असून, वेशी योगासह सुकर्मा योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, त्यामुळे दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. जाणून घ्या अशात कोणत्या ५ लकी राशींना लाभ होत आहे.
आज व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता असून धनलाभ होईल. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल.
आज कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर बाबी पूर्ण कराल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. पद-प्रतिष्ठा लाभेल.
आज नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणूक करायला हरकत नाही. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल. कुटुंबावर खर्च होईल. प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. पद प्रतिष्ठा लाभेल.
आज तुमच्या आकर्षक बोलण्यामुळे तुमची कामे पटकन होऊन जातील. कामाचा दर्जा सुधारेल. अडचणी सोडवाल. एखादी छोटी सकारात्मक गोष्टसुद्धा तुम्हाला खूप मोठा आनंद देवून जाईल. त्यामुळे आर्थिक भरभराट व्हायलाही मदत होईल. आर्थिक समस्या दूर होईल. मनोबल उंचावलेल असेल. कायदेशीर कामात यश मिळेल. धाडसी निर्णय घ्याल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना दिवस फायदेशीर राहील.
आज आपला नावलौकिक वाढेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याचा योग आहे. व्यवसायात धाडसाची कामे कराल आणि त्यात यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिवस आहे. गत काळात केलेल्या कार्यातून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील.