मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky zodiac signs today : 'या' राशींसाठी आजचा दिवस समाधानाचा, तुमची रास कोणती?

Lucky zodiac signs today : 'या' राशींसाठी आजचा दिवस समाधानाचा, तुमची रास कोणती?

HT Marathi Desk HT Marathi
Sep 15, 2023 11:21 AM IST

Lucky zodiac signs today 15 september 2023 : चंद्र-शुक्राचा योग आज काही राशींसाठी आर्थिक भरभराटीचं कारण ठरणार आहे. कोणत्या आहेत या राशी?

Lucky Zodiac signs today
Lucky Zodiac signs today

मकर : आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. नियोजित कामं मार्गी लागतील. संपूर्ण दिवस प्रसन्न जाईल. नवे संबंध जोडले जातील. अंगभूत कलागुणांना वाव मिळेल. समाजात नाव, प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. घरात नातेवाईक, मित्र-मंडळींचं आगमन होईल. चांगल्या घटना घडतील. साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्यांसाठी चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. संशोधनाच्या विषयावर काम करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मित्रमंडळींची साथ मिळेल, त्यामुळं अनेक गोष्टी सोप्या होऊन जातील. शुभ रंग: निळा शुभ दिशा: नैऋत्य.

ट्रेंडिंग न्यूज

मीन : यश, इच्छापूर्ती आणि समाधानानं भरलेला आजचा दिवस जाईल. मनाजोग्या घटना घडतील. आध्यात्माची ओढ लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. सत्संग लाभेल. नोकरदार वर्गासाठीही चांगला दिवस आहे. नव्या नोकरीचे उत्कृष्ट प्रस्ताव येतील. तुमच्याकडून वरिष्ठांची मर्जी राखली जाईल. कुटुंबातील वातावरण आनंदाचं राहील. त्यामुळं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. उद्योग-व्यवसायात लाभाचा योग आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग संभवतो. प्रशासकीय कामकाजासाठी शुभ दिवस आहे. शुभ रंग: पिवळा शुभ दिशा: ईशान्य.

कुंभ : या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. आर्थिक भरभराटीचा योग आहे. नव्या संधी प्राप्त होतील, त्यातून आर्थिक लाभ होईल. नोकरी व्यवसायात प्रगतीचा योग आहे. बढतीची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नव्या योजनांवर काम सुरू होईल. मान्यवरांचा सहवास लाभेल. तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. पाठीवर शाबासकीची थाप मिळेल. भावा-बहिणीशी उत्तम संवाद राहील. मानसिक व शारीरिक आरोग्य ठणठणीत राहील. संशोधनाच्या क्षेत्रातील लोकांनाही यशाचा योग आहे. शुभ रंग: जांभळा शुभ दिशा: पश्चिम.

धनु : माझे कुटुंब, सुखी कुटुंब… याची प्रचिती आज धनु राशीच्या व्यक्तींना येणार आहे. प्रत्येक कामात कुटुंबातील सर्व सदस्यांची साथ मिळेल. भावंडांकडून पैशांची मदत होईल. पत्नी व मुलांशी उत्तम संवाद आणि मधुर संबंध राहतील. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. पैसा हातात राहिल्यानं नवी खरेदी होण्याची शक्यता आहे. नव्या खरेदीमुळं कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. नव्या योजना सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. मित्रमंडळींचीही साथ लाभेल. प्रवासातून आर्थिक लाभाचा योग आहे. कुटुंबात शुभकार्याची आखणी होईल. शुभ रंग: पिवळसर शुभ दिशाः ईशान्य.

WhatsApp channel