Lucky Zodiac Signs : धंद्यात विशेष लाभ मिळेल! या ५ लकी राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा मंगळवार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : धंद्यात विशेष लाभ मिळेल! या ५ लकी राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा मंगळवार

Lucky Zodiac Signs : धंद्यात विशेष लाभ मिळेल! या ५ लकी राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा मंगळवार

Published Oct 15, 2024 08:54 AM IST

Lucky Rashi Bhavishya 15 October 2024 : आज आश्विन मासातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार होत आहे, अशात या ५ राशीच्या लोकांना मंगळवार लाभदायक ठरेल.

लकी राशीभविष्य १५ ऑक्टोबर २०२४
लकी राशीभविष्य १५ ऑक्टोबर २०२४

आज मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी, चंद्र कुंभ राशीनंतर मीन राशीत जाणार आहे. तसेच आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या तिथीला भौम प्रदोष व्रत केले जाणार आहे. 

भौम प्रदोष व्रताच्या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, भौम प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ योग तयार झाल्यामुळे ५ राशींना फायदा होणार आहे.

मेषः 

आज मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. कामात चांगली प्रगती कराल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. मनासारखी कामे होतील. वाहन खरेदीचे योग आहेत. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापारात वाढ विस्तार होईल. योग्यवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल.

कर्क: 

आज कष्टाचे चीज होईल. वाचनाची आवड जोपासाल आणि ज्ञानाचा आनंद घ्याल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य घ्या. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर मधुर संबंध राहतील. 

सिंहः 

आज तुमचा आनंद अधिकच दुणावेल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करणार आहात. आपणास उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल. भागीदारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. आत्मविश्वासात वाढ होवून मन प्रसन्न राहील.

कन्याः 

आज आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या कामाचे लाभ तुम्हाला चांगले होतील. खेळाडूंना लाभदायक दिवस आहे. बौद्धीक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये अपेक्षेप्रमाणे प्रगती होईल. व्यापारात भागीदारीत अपेक्षित लाभ होईल. नोकरीमध्ये अनुकुल बदल होईल. रखडलेल्या कामास गती मिळेल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. गुंतवणूक लाभ देणार आहे. 

कुंभः 

आज मनासारखे कार्यामुळे तब्येत खूष राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. 

Whats_app_banner